शेतकरी कर्जमाफी: लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया

शेतकरी कर्जमाफी साठी आवश्यक असणारी ३ महत्त्वाची कागदपत्रे

शेतकरी कर्जमाफी ; कर्जमाफीचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी प्रामुख्याने तीन महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये पहिले कागदपत्र म्हणजे बँकेचे पासबुक, ज्याच्या आधारे तुमचे पीक कर्ज (KCC) मंजूर झाले होते. दुसरे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. तिसरे म्हणजे फार्मर आयडी (Farmer ID). जर तुमच्याकडे फार्मर आयडी उपलब्ध नसेल, तर तो महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन वेळीच काढून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढील प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.

गाव पातळीवरील याद्या आणि आधार प्रमाणीकरण (e-KYC)

कर्जमाफीच्या प्राथमिक टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. या याद्या गाव पातळीवर ग्रामपंचायत, सेवा सहकारी संस्था, तलाठी कार्यालय आणि संबंधित बँकांच्या फलकावर लावल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव आणि त्यापुढील विशिष्ट क्रमांक (Unique ID) किंवा आपला आधार क्रमांक नोंदवून घ्यावा. त्यानंतर जवळच्या महा-ई-सेवा किंवा आपली सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच कर्जमाफीची e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची काळजी व सुचना

कर्जमाफीच्या याद्यांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा शेतीचा व इतर कामाचा वेळ न घालवता फोनद्वारे किंवा परिचित व्यक्तींमार्फत आधी खात्री करावी. ग्रामसेवक, तलाठी किंवा विकास सोसायटीच्या सचिवांशी संपर्क साधून आपल्या गावातील यादी आली आहे का, याची माहिती घरबसल्या मिळवावी. विनाकारण बँकांमध्ये किंवा शासकीय कार्यालयांत फेऱ्या मारणे टाळावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कर्जमाफीच्या लाभासाठी सज्ज राहावे.

Leave a Comment