महिला शेतकरी प्रमाणपत्र ; रहिवासी क्षेत्र आणि वयाची अट
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी. महत्त्वाचे म्हणजे, हे प्रमाणपत्र केवळ ग्रामपंचायत आणि नगरपंचायत क्षेत्रातील महिला शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र नसून त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
२. शेतकरी म्हणून पात्रता निकष
शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार, अर्जदार महिलेच्या स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा असणे बंधनकारक नाही. जर महिलेच्या नावावर शेती नसेल, परंतु ती प्रत्यक्ष शेतात काम करत असेल किंवा शेतमजुरी करत असेल, तरीही ती महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीकाम करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व गरजू महिलांना यामध्ये सामावून घेण्यात आले आहे.
३. आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना आणि पडताळणीच्या वेळी महिलांकडे काही महत्त्वाची मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
-
महिलेचे आधार कार्ड
-
रेशन कार्ड
-
मतदार ओळखपत्र (Voting Card) किंवा रहिवासी पुराव्यासाठी लाईट बिल
४. ग्रामसभेचा ठराव आणि प्रमाणपत्र वितरण
केवळ ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरला म्हणजे लगेच प्रमाणपत्र मिळणार नाही. संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीच्या ग्रामसभेत/बैठकीत या अर्जांवर चर्चा होऊन मंजुरीचा ठराव मंजूर केला जाईल. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यानंतरच पात्र महिलांना हे शेतकरी प्रमाणपत्र अधिकृत पोर्टलवरून डाउनलोड करता येईल. त्यामुळे निकष तपासूनच महिलांनी आपले अर्ज दाखल करावेत.