PMAY-G List Check ; घरकुल योजनेची नवीन यादी मोबाईलवरून कशी पाहायची? (PMAY-G List Check)

PMAY-G List Check ; घरकुल योजनेची नवीन यादी मोबाईलवरून कशी पाहायची? (PMAY-G List Check)

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच राज्य शासनाच्या इतर विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत घरकुलाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी नवीन यादी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना आता ग्रामपंचायत किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता अवघ्या दोन ते तीन मिनिटांत घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या गावाची पात्र लाभार्थी यादी पाहता येते.

अधिकृत पोर्टल उघडणे आणि ‘AwaasSoft’ पर्याय निवडणे

यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमधील गुगल ब्राउझरमध्ये जाऊन pmayg.nic.in सर्च करावे. सर्च केल्यानंतर ‘Department of Rural Development’ चे अधिकृत पोर्टल उघडावे. पोर्टलवरील मेन्यू बारवर क्लिक करून ‘AwaasSoft’ या पर्यायावर टच करावे आणि त्यातील ‘Report’ हा पर्याय निवडावा.

लाभार्थी पडताळणी पर्याय (Beneficiary Details for Verification)

‘Report’ पेज उघडल्यानंतर खाली स्क्रोल करून ‘H. Social Audit Reports’ या विभागात जावे. तिथे असलेल्या ‘Beneficiary details for verification’ या पर्यायावर क्लिक करावे. या पर्यायामुळे गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती पडताळणीसाठी उपलब्ध होते.

गाव, वर्ष आणि योजनेची निवड करणे

पुढील पानावर ‘Selection Filters’ मध्ये अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम राज्य (महाराष्ट्र), त्यानंतर जिल्हा, तालुका आणि शेवटी आपली ग्रामपंचायत निवडावी. त्यानंतर आर्थिक वर्ष निवडून, ज्या योजनेसाठी अर्ज केला होता (उदा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास, मोदी आवास, किंवा इतर योजना) ती योजना निवडून ‘Submit’ बटनावर क्लिक करावे.

यादी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करणे

माहिती सबमिट केल्यानंतर खाली ‘Download PDF’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमच्या ग्रामपंचायतीची संपूर्ण लाभार्थी यादी मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल. या पीडीएफ फाईलमध्ये गावातील कोणत्या लाभार्थ्यांचे नाव मंजूर झाले आहे, कोणाला किती हप्ते मिळाले आहेत आणि कामाची सद्यस्थिती काय आहे, याची सविस्तर माहिती घरबसल्या तपासता येते.

Leave a Comment