Farmer ID शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: फार्मर आयडी (Farmer ID) दुरुस्ती आता ऑनलाइन सुरू

Farmer ID शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: फार्मर आयडी (Farmer ID) दुरुस्ती आता ऑनलाइन सुरू
फार्मर आयडी दुरुस्तीची प्रतीक्षा संपली

Farmer ID ; राज्यातील लाखो शेतकरी ज्या महत्त्वपूर्ण अपडेटची वाट पाहत होते, त्या फार्मर आयडी (Farmer ID) दुरुस्तीच्या प्रक्रियेबाबत अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता शेतकऱ्यांना स्वतःच्या स्तरावर ऑनलाइन लॉगिन करून आपल्या फार्मर आयडीमधील विविध प्रकारच्या त्रुटी किंवा चुका दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जमिनीच्या गटांची दुरुस्ती आणि बदल

सुरुवातीला फार्मर आयडी तयार करताना अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे गट क्रमांक जोडायचे राहिले होते. याशिवाय, जमिनीची नवीन खरेदी-विक्री झाल्यास नवीन गट जोडणे किंवा जुने गट कमी (डिलीट) करणे आवश्यक होते. आता या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी सहजपणे नवीन गट जोडू शकतात तसेच अनावश्यक किंवा विकलेले गट हटवू शकतात. यासोबतच वनपट्टाधारक शेतकऱ्यांनाही आपली जमीन या फार्मर आयडीमध्ये समाविष्ट करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मोबाईल नंबर बदलण्याची सोय

फार्मर आयडी काढताना अनेकांचे मोबाईल नंबर चुकीचे नोंदवले गेले होते, ज्यामुळे आवश्यक संदेश (SMS) आणि सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हत्या. पूर्वी जुना मोबाईल नंबर टाकूनच व्हेरिफिकेशन करावे लागत असल्याने नंबर बदलणे कठीण होते. मात्र, आता आधारच्या माध्यमातून पडताळणी (Verify) करून शेतकरी आपला नवा आणि चालू मोबाईल नंबर स्वतः अपडेट करू शकणार आहेत.

केवायसी (KYC) आणि माहिती अद्ययावत करणे

फार्मर आयडीमधील केवायसी संबंधित बाबींसाठी देखील पर्याय देण्यात आले आहेत. पोर्टलवर केवायसीचे तपशील, री-केवायसी (Re-KYC) किंवा पडताळणी पूर्ण करता येणार आहे. यामुळे शेतकरी शासकीय योजना आणि अनुदानांपासून वंचित राहणार नाहीत आणि त्यांची माहिती अचूक राहण्यास मदत होईल.

पोर्टलवरील नवीन ‘Update My Information’ टॅब

या सर्व बदलांसाठी Agrisack च्या अधिकृत पोर्टलवर (mhfr.agristack.gov.in) शेतकऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध आहे. लॉगिन केल्यानंतर त्यामध्ये ‘Update My Information’ नावाचा एक नवीन पर्याय जोडण्यात आला आहे. याद्वारे शेतकरी नॉन-केवायसी माहिती, मोबाईल नंबर तसेच जमिनीचे तपशील स्वतः दुरुस्त करू शकतात.

Leave a Comment