मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार ₹१,५००

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार ₹१,५००

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत पात्र असलेल्या आणि जुलै महिन्याच्या प्रलंबित हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनामार्फत जुलै महिन्याचा थकीत हप्ता महिलांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग (क्रेडिट) करण्यास सुरुवात झाली आहे.

खात्यात जमा होणार १५०० रुपयांची रक्कम

या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपयांची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा केली जात आहे. राज्य शासनाने यापूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला होता. आता तोच निधी थेट महिलांच्या खात्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दिलासा

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर महिलांना हा हप्ता कधी मिळणार किंवा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होणार का, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, सद्यस्थितीत शासनाने एकाच हप्त्याचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जुलै महिन्याचा प्रलंबित असलेला १५०० रुपयांचा हप्ता वितरणासाठी घेण्यात आला आहे.

टप्प्याटप्प्याने होणार निधी वितरण

या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून काही लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी, तर उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात उद्या व परवापर्यंत पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पुढील एक-दोन दिवसांत रक्कम जमा पूर्ण होईल.

किती महिलांना मिळणार लाभ?

एकूण लाभार्थ्यांपैकी पडताळणीनंतर ९२ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे हप्ते बंद किंवा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ६० लाखांपेक्षा जास्त पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला जात आहे.

संबंधित व्हिडिओ: येथे क्लिक करून व्हिडिओ पहा

Leave a Comment