Todkar havaman ; सप्टेंबर महिन्यातील हवामान अंदाज आणि पावसाची शक्यता

Todkar havaman ; सप्टेंबर महिन्यातील हवामान अंदाज आणि पावसाची शक्यता

सध्या राज्यातील अनेक भागांत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असली, तरी २९ ऑगस्टपासून हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल. ३० आणि ३१ ऑगस्टदरम्यान ढगाळ वातावरण अधिक वाढेल. २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर या कालावधीत हवामान सक्रिय होणार असून, यामुळे विदर्भ, खान्देश तसेच मराठवाड्यातील काही भागांतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

२ ते ४ सप्टेंबरदरम्यान नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ठीकठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या प्रणालीचा मुख्य मार्ग मध्य प्रदेशकडे जात असला, तरी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे धुळे, जळगाव आणि नाशिक (मालेगाव, येवला, निफाड, देवळा) परिसराला त्याचा अंशतः फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २ ते ६ सप्टेंबरदरम्यान हवामान ढगाळ राहील. या काळात स्थानिक पातळीवर तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. अहिल्यानगर, सोलापूर आणि लातूरच्या दक्षिण भागातही काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.

सध्या वाहणाऱ्या वेगवान पश्चिमी वाऱ्यांमुळे कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेश व राजस्थानकडे सरकत आहेत. हे वारे ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान शांत व कमजोर होण्याची शक्यता आहे. वारे शांत झाल्यानंतर तापमानात स्थानिक बदल घडून येऊन १२ सप्टेंबरच्या सुमारास राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या अनुषंगाने चांगल्या पावसासाठी पूरक वातावरण तयार होऊ शकते.

सध्या पिके सुकण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याच्या चिंतेमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. कृत्रिम पावसाबाबत चर्चा होत असली तरी प्रशासकीय प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता चालू हंगामात नैसर्गिक पावसावरच मुख्य भिस्त राहणार आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण आणि स्थानिक पावसाच्या सरी कितपत दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडिओ: http://www.youtube.com/watch?v=yNTGcjqzvKw

Leave a Comment